गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपींच्या वारजे माळवाडी पोलीस आवळल्या मुसक्या, वारजे माळवाडी पोलीसांची कामगिरी
सौ. कलावती गवळी प्रतिनिधी. (पुणे शहर)
पुणे शहर वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काड़ेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकांतील अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत घडणारे गंभीर गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणून पेट्रोलींग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना बातमी मिळाली की, बारटक्के हॉस्पीटलचे शेजारी गोकुळनगर पठारवरून येणाऱ्या रोडच्या उताराला एक इसम थांबलेला असून त्याचेकडे पिस्टलसारखी दिसणारी वस्तू आहे, त्याने टक्कल केलेला असून अंगावर काळ्या रंगाचा फुल टिशर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. अशी बातमी मिळाल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील पोलीस उप-निरीक्षक श्री संजय नरळे व पोलीस स्टेशन कडील स्टाफसह सदर ठिकाणी जावुन बातमीतील वर्णनाचे इसमाचा शोध घेतला असता एक इसम संशवीत रित्या हालचाल करीत असल्याचे दिसल्याने सदर इसमांस ताब्यात घेवुन त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव साहिल धनंजय राऊत, (वय २० वय ) रा. सुरभी कॉलनी, अष्टविनायक चौक वारजे माळवाडी पुणे) असे असल्याचे सांगितले नंतर त्याची अंगझडती घेता त्याचे कब्जात २०,०००/- रु.कि. चे एक सिल्वर रंगाच्या धातूचे देशी बनावटीचे पिस्टल व मॅगझीन मिळून आले ते पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे यांनी जप्त करून ताब्यात घेतले.
नमुद इसम नामे साहिल धनंजय राऊत, (२० वय) रा. सुरभी कॉलनी, अष्टविनायक चौक, वारजे माळवाडी पुणे ) यांच्या विरोधांत अग्नीशस्त्र बाळगले बाबत पोलीस अंमलदार बालाजी काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ८८/२०२५ भारतीय शस्व अधि. कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७(१) सह १३५, नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरचे अग्नीशस्व कोठुन आणले व कशासाठी जवळ बाळगले याबाबत अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे तपास करीत आहेत. सदरची कामगिरी ही संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ पुणे शहर, भाऊसाहेब पठारे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजीत काईंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे, निलेश बडाख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, योगेश वाघ, सागर कुंभार, अमित शेलार, गोविंद कपाटे, निखील तांगडे व शरद पोळ आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
