अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
निळेवादळ प्रतिष्ठान, लहुजी ग्रुप व दीक्षार्थी संघाच्या वतीने भवानी पेठ व काशेवाडी या ठिकाणी पाणपोईचे उद्घाटन,
प्रतिनिधी शंकर जोग
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पुण्यात स्वर्गीय सतीश ससाणे, स्वर्गीय दादू आव्हाड, व स्वर्गीय विजय कांबळे यांच्या स्मरणार्थ, निळेवादळ प्रतिष्ठान, लहुजी ग्रुप व दीक्षार्थी संघाच्या वतीने, भवानी पेठ जुना मोट र स्टॅन्ड आणि काशेवाडी मध्ये पाणपोईचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख व पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आयोजन आरपीआयचे संदीप धांडोरे सुरज कांबळे यांनी केले,
यावेळी प्रमुख पाहुणे शशांक माने, संतोष धांडोरे, शाहरुख शेख, निलेश जगताप, सुशील मंडल, प्रवीण बनसोडे, रवींद्र कांबळे, राजेश गाडे, शाबीर सय्यद, कुणाल सोनवणे हरीश बाबर, अक्षय भोसले, संग्राम घंघाळे, आदि यावेळी उपस्थित होते
