जेष्ट पत्रकार सखाराम कुलकर्णी यांच्या निवेदनाची दरवल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांची सुरक्षा कमी केल्या.
संपादक संतोष लांडे
नांदेड- राज्यात पोलासांची संख्या बळ कमी असून असलेल्या संख्या बळातील अर्ध्याच्या वर पोलीस राजकीय पुढाऱ्यांच्या व अति महत्वाच्या व्यक्तीच्या संरक्षणात तैनातीत असल्यामुळे गुंडागर्दी चे प्रमाण वाढून सर्व सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आल्यामुळे राजकीय पुढाऱ्यांचे संरक्षण काढून जनतेच्या संरक्षणास घावे. अशा अशयाचे निवेदन जेष्ठ पत्रकार सरवाराम कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि.१ जाने २०२५ रोजीच दिले होते .या निवेदनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांची वाय सुरक्षा काढून मागे – पुढे असलेल्या पोलीस गाड्यांचा ताफा काहून घेतला.
राज्यात लोकसंखेच्या प्रमाणात पोलीस अधिकारी व पोलीस बळांची संख्या फार कमी आहे. व असलेल्या पोलीस बळाच्या संखेतील अर्ध्याच्यावर पोलीस व अधिकारी मंत्री, खासदार व आमदार तसेच आति महत्वाच्या श्रीमंत लोकांच्या तैनातीत असतात. राज्यातील बऱ्याच खासदार आमदारांच्या मागे पुढे १५-२० पोलीस व पोलीसीच्या गाड्या असतात. वास्तवक हे लोक प्रतिनिधी जनतेचे असतात. त्यांच्या जिवाच्या धोक्या पेक्षा नागरीकांच्या जीवाला धोका वाढला आहे. रोज प्रत्येक जिल्हयात सरासरी ५-१० खुनाच्या घटना घडत आहेत.
काही वर्षांपूर्वी(सन 2022 )शिवसेनेत फुट पडली होती व काही आमदार- खासदार शिंदे शिवसेना गटात गेले होते. त्या वेळेस त्यांच्या संरक्षणास वाय सुरक्षा त्यांना दिली होती. आता त्यांच्या जिवाला काही धोका, भिती राहीली नाही . त्यामुळे आता त्याची सुरक्षा कमी करावी अशी मागणी पञकार कुलकर्णी यांनी केली होती. राज्यात पोलिसाच्या संख्ये पेक्षा गुंडांची संख्या जास्त आहे. तर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आशिर्वादाने गुंडांची संख्या वाढत आहे. जिल्यातील अती संवेदनशील भागात पोलीस चौक्या स्थापन केल्या. पण पोलीस कर्मचायांच्या कमतरतेमुळे पोलीस चौक्या बंद आहेत. त्यामुळे खासदार, आमदार यांचे पोलीस संरक्षण कमी करणे आवश्यक आहे. पुढाऱ्यांचा जीव जितका महत्वाचा मोलाच आहे. तितकाच सर्व सामान्य नागरिकांचा जीव मोलाचा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणा कडे लक्ष देण्यास पोलीसांचे संख्याबळ वाढवावे. अशा आशयाचे निवेदन जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक यांना१ जानेवारी२०२५ लाच दिले होते या निवेदानावर गृह विभागाकडून पोलीस महासंचालक यांचेकडे चौकशी साठी पत्र दिले .त्या नंतर एस आय टी कडे चौकशी अहवाल साठी पत्र दिले. सरवाराम कुलकर्णी यांच्या पाठपुराव्यामुळे चौकशीस गती आली व काल दि
१८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना भाजपा सह वाय सुरक्षा असलेल्या आमदाराची वाय सुरक्षा काढून घेतली. मात्र या आदेशामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
