अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात साजरा…..
जालना प्रतिनिधी हनुमंत दवंडे
14 फेब्रुवारी या दिवसाचे महत्त्व जर कोणालाही विचारले तर अनेक जण आज व्हॅलेंटाईन दिवस आहे प्रेम दिवस आहे असे सांगतात,परंतु हे साजरे करणे पाश्चात्त्य संस्कृती आहे. 14 फेब्रुवारी या दिवशी मातृ-पितृ पूजन दिवस साजरा केला जावा. आई-वडिलांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्याविषयी असणारा आदर भाव व्यक्त केला जावा यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
आई वडील हे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. विद्यार्थ्यांमध्ये आपल्या आई वडिलांविषयी प्रेम, आस्था, आदर निर्माण व्हावा यासाठी आज छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल मध्ये मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांविषयी मनोगत देखील व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे आई-वडील उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये माजी प्राचार्य भगवानराव दिरंगे, माजी नायब तहसीलदार बाजीराव काळुंके संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार काळूंके, संस्थेच्या सचिव मीनाक्षी काळूंके, शाळेचे मुख्याध्यापिका लंका भवर, इतर मान्यवर उपस्थित होते.
भगवानराव दिरंगे यांनी विद्यार्थी तसेच पालकांना मार्गदर्शन करतानाआई-वडिलांचे जीवनात असणारे महत्त्व यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप मुख्याध्यापक अरुण चंदने, ज्योती खैरे, शेषनारायण बिल्लारे, पुरुषोत्तम मगर, श्याम चव्हाण, नागेश्वर क्षीरसागर, दुर्गा भोसले, मंजुषा बोंडे,सुरज पहाडे, साधना पाईकराव, अखिलेश कुमार, महानंदा व्यवहारे, अश्विनी यंदे, मीना मसलेकर ,शुभम चव्हाण, यांनी अथक परिश्रम घेतले.
