अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ग्राहक कल्याण परिषद, माहिती अधिकार संरक्षण समिती व राज्य परिवहन महामंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवासी दीन उत्साहात साजरा.
वार्ताहर ज्योत्स्ना करवाडे.
भारतीय संस्कृतीत रथ सप्तमी ला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि याच दिवशी सूर्याचा प्रवासही चालू होतो.दिवस मोठा मोठा होत जातो त्या अनुषगाने अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद व माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती व नागरी विकास मंच व राज्य परिवहन महामंडळ नागपूर यांच्या वतीने4 फेब्रुवारी या प्रवासी दिनाच्या कार्यक्रम 5 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य परिवहन महामंडळ गणेश पेठ नागपूर येथे आयोजित करण्यात आला त्यावेळी उपस्थित पाहुणे मंडळी नागरी विकास मंचाचे अध्यक्ष ग्राहक संरक्षण समितीचे विदर्भ अध्यक्ष मिलिंद खेकाळे सर व माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीच्या अमरावती महिला जिल्हाध्यक्ष सौ जोशना करवाडे व राज्य परिवहन महामंडळ नागपूर चे व्यवस्थापक श्री अभय बोबडे , नागरी विकास मंचाचे श्री यशवंत जी खरे आधी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमां अंतर्गत ज्यांनी अविरत 30 वर्षे सेवा वाहक व चालक म्हणून दिल्या आणि एकही एक्सीडेंट केला नाही प्रत्येक प्रवासाची नीट काळजी घेतली अशा तीन व्यक्ती म्हणजे श्री ठाकरे सर नागपूर सरआणि नांदने मॅडम यांना शाल श्रीफळ प्रमाणपत्र आणि स्मृती चित्र व बुके देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले खेकाले यांनी सन्मान पत्राचे वाचन केलें तर अभयजी बोबडे यांनी आमच्या कर्मचाऱ्यांकडून कुठलही प्रवाश्यांना त्रास होणार नाही याची ग्वाही दिली यशवंत जी खरे यांनी वाहक व चालक यांच्यावर कशी आपण सर्व प्रवाशांची काळजी घेतात हे सांगितले तर ज्योत्स्ना करवाडे मॅडम यांनी आरटीओ यांनी जे रस्त्याचे नियम आखून दिले आणि ते जनतेने सुद्धा कसे पाळले पाहिजे की ज्यामुळे वाहक आणि चालक यांना गाडी चालवताना त्रास होणार नाही याबाबत प्रकाश टाकला.
शेवटी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली
