एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

विप्रो, इन्फोसिस आणि TCS मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सची भरती करणार, IT क्षेत्रातील करिअरची संधी सोडू नका | IT Jobs 2025

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

अजिंक्य नोकरी सहायक | IT Jobs 2025: आयटी क्षेत्रात मागणी वाढत असल्याचे संकेत मिळत असतानाच, देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस आणि TCS यांनी फ्रेशर्सची मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आयटी कंपन्यांमध्ये करिअरची स्वप्नं पाहणाऱ्या तरूण-तरूणींसाठी 2025 हे वर्ष नक्कीच फायदेशिर ठरणार आहे.

विप्रोची योजना– Wipro Jobs 2025

विप्रोने आर्थिक वर्ष 2024-25 आणि 2025-26 मध्ये दरवर्षी 10,000 ते 12,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे.

तिसऱ्या तिमाहीतील भरती: 7,000 फ्रेशर्सची भरती याआधीच पूर्ण झाली आहे.

चौथ्या तिमाहीतील उद्दिष्ट: 2,500 ते 3,000 फ्रेशर्सची भरती होणार.

तंत्रज्ञानाचा वापर: कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने भरती प्रक्रियेत गती आणण्यावर भर देत आहे.

आर्थिक कामगिरी: तिसऱ्या तिमाहीत 24.4% वाढीसह निव्वळ नफा ₹3,354 कोटी, तर महसूल 0.5% वाढीसह ₹22,319 कोटी झाला आहे.

इन्फोसिसची योजना – Infosys Jobs 2025

इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2026 मध्ये 20,000 हून अधिक फ्रेशर्सची भरती करण्याची घोषणा केली आहे.

2025 साठी उद्दिष्ट: 15,000 फ्रेशर्सची भरती.

कामगिरी: आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने वार्षिक महसूल वाढ 3%-4% इतकी अपेक्षित ठेवली आहे, जी पूर्वी 1%-3% होती.

TCSची योजना – TCS Jobs 2025

TCSने देखील येत्या आर्थिक वर्षांमध्ये फ्रेशर्सची भरती मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

2023-24 मधील भरती: TCSने याआधी 40,000 हून अधिक फ्रेशर्सची भरती केली होती.

तंत्रज्ञानावरील भर: TCS प्रगत तंत्रज्ञान कौशल्यांसाठी विशेष भरती मोहिमा राबवत आहे, जसे की ब्लॉकचेन, डेटा अॅनालिटिक्स आणि AI.

दिग्गज आयटी कंपन्यांमधील भरतीचे तुलनात्मक विश्लेषण – अजिंक्य नोकरी सहायक.

  • विप्रोने AI च्या मदतीने गतीमान भरती प्रक्रिया राबवण्यावर भर दिला आहे.
  • इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2026 पर्यंतचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवले आहे.
  • TCS प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात फ्रेशर्सना मोठ्या संधी उपलब्ध करून देत आहे.

ग्रुप मध् जॉईन होण्यासाठी खालील ब्ल्यू अक्षरांवर क्लिक करा.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link