एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

चोरट्याकडून दोन ऑटो रिक्षा एक मोटरसायकल हस्तगत, आरोपीला ठोकल्या बेड्या, समर्थ पोलीस ठाणेची दमदार कामगिरी

पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी

चोरट्याकडून दोन ऑटो रिक्षा एक मोटरसायकल हस्तगत, आरोपीला ठोकल्या बेड्या, समर्थ पोलीस ठाणेची दमदार कामगिरी, संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. पुणे शहरांतील समर्थ पोलीस ठाणेच्या हद्दीमधील नरपतगिरी चौका जवळील राजधानी हॉटेल समोर पार्क असलेली ऑटो रिक्षा अनेक दिवस ही रिक्षा जागेवर असल्यांचे पाहून चोरट्याने ती चोरून नेली समर्थ पोलिसांनी सी.सी.टीव्ही फुटेज तपासून अखेर पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचले चोरट्याकडूंन ही ऑटो रिक्षा जप्त करीत त्याचबरोबर आणखीन एक रिक्षा आणि चोरीची मोटरसायकल ताब्यांत घेवुन एकुण तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत, याप्रकरणी आनंद उर्फ अक्षय प्रल्हाद साळुंखे (वय 23) रा. मानकाईनगर आव्हाळवाडी) असे आरोपींचे नाव आहे, याबाबत विजयशंकर रामअधार पाठक (वय 70) रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती, फिर्यादींचे जावई प्रदीपकुमार उपाध्याय हे ही रिक्षा चालवतात मात्र ते एक महिन्यांपासून मुंबईला गेले होते, तेव्हापासून रिक्षा त्यांनी सोसायटी समोरील सार्वजनिक जागेत पार्क केली होती, ते रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना रिक्षा पाहत होते, विजयशंकर पाठक यांच्या फिर्यादीवरून समर्थ पोलिसांनी तपासाची चक्रे चांगलीच गतिमान करीत चतु:र्शिंगी पोलीस ठाणेच्या हद्दीमधून चोरीला गेलेली रिक्षा आणि हडपसर पोलीस ठाणेच्या परिसरांतून चोरीला गेलेली मोटरसायकल असे तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत, सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल सहाय्यक पोलीस आयुक्त साईंनाथ ठोंबरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे सहा. फौ. संतोष पागार पोलीस.अंमलदार इम्रान शेख रवींद्र आचारे शिवा कांबळे अमोल गावडे रहीम शेख शरद घोरपडे कल्याण बोराडे आदीं पोलिसांनी या कारवाई सहभाग घेतला,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link