पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : हंसराज पाटील.
पिंपरी भोसरी महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या अंतिम पडाव मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजीची 17/11/24 सायंकाळी भोसरी विधानसभेचे बीजेपी उमेदवार उमेदवार “महेश किसनराव लांडगे , यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प सभेचे आयोजन केले होते ” बटेंगे तो कटेंगे ,चा नारा देऊन हिन्दू मतदाराला जाती पाती मध्ये विभाजित होण्यापासून कुठेतरी रोखले गेल्याचे चित्र दिसत आहे.
या सभेला मावळ खासदार श्रीरंग बारणे,आमदार अमित गोरखे आमदार उमा खापरे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष ( अजित पवार गट) योगेश बहल व अनेक नामवंत उपस्थित होते .
योगी आदित्यनाथजी च्या सभेसाठी गावजत्रा मैदानात विशाल जनसमुदाय दिसून आला.
योगीजी म्हणाले” बटे थे तो कटे थे ,
अब बटेंगे नहीं ” सेफ रहेंगे अशी हाक दिली. देशात कॉंग्रेसचे सरकार असताना पाकिस्तान घुसखोरी ,आतंकवादी हल्ले करत होता आता नाही करत का.
कारण आता मोदी सरकार आहे. हम किसी को ” छेडेंगे नहीं , कोई हमें छेड़ेगा तो उसे छोडेंगे भी नहीं,
हा मेसेज जगभरात गेला आहे. त्यामुळे, जर सुरक्षित रहायचे असेल तर महायुती शिवाय पर्याय नाही असे योगीजी म्हणाले.
कॉंग्रेस केवळ आपल्या खानदानी परिवाराचा विकास करू पाहते त्यांना देशाशी काही देणे घेणे नाही.
विशाल गडावर अतिक्रमण हटविण्यासाठी गेल्यानंतर दगडफेक होते असे का, गडावर अतिक्रमण का झाले, अयोध्या, काशी, मथुरा मध्ये 1947 ला लाखों हिन्दूची हत्या का झाली कारण आपण एकत्रित नव्हतो.
आज आपणाला एकत्रित राहण्याची आवश्यकता आहे. असेच एकत्रित राहून येत्या 20 तारखेला महेश दादा लांडगे यांना भरघोस मतदान करून निवडून आणणे ही आपली जिम्मेदारी आहे असे ते म्हणाले.








