श्रावस्ती फाउंडेशन | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय
कोंढवे धावडे – श्रावस्ती फाउंडेशन दिव्यांग मुलामुलींची शाळा, श्री स्वामी अंगण वृध्दाश्रम व विसावा सोशल फाउंडेशन येथे एन्जॉय ग्रूप पुणे यांच्या वतीने दिवाळी साठी फटाके व मिठाई वाटप करत थोर समाजसेविका सौ. अनंतलक्ष्मी कैलासन यांच्या शुभहस्ते देत आपली दिवाळी एका अनोख्या उपक्रमाने साजरी करत जिथं गरज तिथेच मदत अनोखा संदेश देत दिवाळी साजरी न करता मदतीची दिवाळी साजरी केली.
या वेळी जवळ पास शंभर मिठाईचे बॉक्स व दीव्यांग मुलांना दोन पोती फटाक्याची मदत करणारा पाहिलाच एन्जॉय ग्रूप पाहिला निस्वार्थ मदत करणारी पहिलीच समाजसेविका ही सौ.अनंतलक्ष्मी कैलासन यांच्या रूपात दिसली तसेच सामाजिक बांधिलकीची दिवाळी साजरी होणे गरजेचे आहे, आपणं दीपावली साजरी करत असताना आपल्या मुळे वृद्ध माता पित्यांची, दिव्यांगांची, गरीब जनतेची दिवाळी कशी साजरी होईल याकडे लक्ष देणं गरजेचं वाटतं आहे, आपणं देणं लागतो या समाजाच्या बांधिलकीच पुण्य कसेही मिळू शकते पण कर्मृरूपी आशिर्वाद आपणास फक्त आपण करत असलेल्या प्रामाणिक कार्यामुळेच प्राप्त होते त्यासाठी जाणीव असणे फार गरजेचे असते ही जाणीव समाजातील प्रत्येक व्यक्तीला ज्या वेळेस होईल त्याच वेळेस खरी दिवाळी साजरी होईल अस मनोमन वाटते असे मत यावेळी साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत ( शिवबांचा छावा ) महा. प्रदेश प्रवक्ता, इंटरनॅशनल ग्लोबल ह्युमन राईट्स पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी व्यक्त केले.
या मदत कार्यामध्ये खारीचा वाटा हा समाजसेविका अनंत लक्ष्मी कैलासन,समाजसेवक श्री.दिलीप ढमाले, सौ. निताताई ढमाले, श्री. सचिन बडदे, व सौ. मनीषा निंबाळकर व एन्जॉय ग्रूप यांनी उचलला.
या कार्यक्रमाला नामदेव कांबळे, किरण दगडे, अशोक आटोळे, अभिजित पवार व श्रीरंग गायकवाड हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत यांनी केले होते.
सामाजिक बांधिलकी जपत आपण आमच्या संस्थेस मदत केली त्याबद्दल श्रावस्थी फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. कांचनाताई कदम, स्वामी अंगण वृद्धाश्रमच्या संस्थापिका सौ. आनंदीताई जोशी, व विसावा सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. स्वातीताई तरडे मुंडेवाडी यांनी आभार मानले.