एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सरकारकडून उपोषण मागे घेण्याची विनंती, मात्र शीतल करदेकर आमरण उपोषणावर ठाम !

पत्रकार बांधव | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादक‌ : संतोष लांडे.

शिंदे- करदेकर फोन वरुन संवाद,मुख्यमंत्र्यांशी भेट व मागण्यांवर ठाम.

मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून दिले आश्वासन.पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या १० वर्षांपासून शीतल करदेकर यांचा लढा सुरू आहे.

बुधवार दि.१०जुलै २०२४ रोजी आझाद मैदान,मुंबई येथे शीतल करदेकर यांचे आमरण उपोषण सुरू आहे.त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी तथा माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

पण शीतल करदेकर आपल्या मागण्यांवर ठाम राहत जोपर्यन्त मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेट होत नाही आणि अधिवेशनात वेलफेअर बोर्डाची घोषणा होत नाही,महामंडळासाठी १.५ ची आर्थिक तरतुद करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे ठाम पणे सांगितले.

पात्रुडकर यांनी अखेर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून शीतलताई यांच्याशी बोलणे करून दिले.यावेळी शीतलताई म्हणाल्या की “दादा आपण भेटत नाही म्हणून आपली बहीण उपोषणास बसली आहे.जो पर्यंत आपली भेट होऊन आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहणार” असल्याचे सांगितले.मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी बैठक लावण्याचे आश्वासन दिले.मात्र करदेकर उपोषणावर ठाम असून मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्यावरच उपोषण सोडणार असे स्पष्ट सांगितले.

आझाद मैदानावर मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने सुरू असलेल्या शीतलताईं च्या आमरण उपोषणास माईचे संस्थापक सरचिटणीस डॉ.सुभाष सामंत, मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस,सहकोषाध्यक्ष चेतन काशीकर,संस्थापक सदस्य शेखर धोंगडे,डाॅ अब्दुल कादिर, लक्ष्मिकांत घोणसे पाटील,सुनील कटेकर,प्रवीण वाघमारे,गणेश तळेकर,पराग सारंग,भुपेश कुंभार,भूषण मांजरेकर,विवेक कांबळे, चंद्रशेखर पाटील,दीपक चिंदरकर,यांच्यासह अनेक सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link