ACP म्हणून निवृत्त झालेले सुरेश वराडे साहेब यांचे हृदयविकाराने दुःखद निधन.
प्रतिनिधी मुकुंद मोरे
खाकी वर्दीतही सहृदयी माणूस असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुरेश वराडे साहेब. पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते ठाण्याचे एसीपी हा त्यांचा कारकिर्दीचा आलेख चकित करणारा राहिला. कोकण आणि मुंबई परिसरात त्यांची सर्वाधिक काळ सेवा झाली. अलिबागमध्ये ते बरीच वर्षे रमले. आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे महाराष्ट्रभर मोठा मित्रपरिवार त्यांनी गोळा केला होता. अकोले येथील चोथवे परिवाराचे ते जावई होते. संगमनेर मधील युवा उद्योजक, सिद्धिविनायक प्लायवूडचे संचालक संदीप चोथवे यांचे ते मेहुणे होते. निवृत्तीनंतर त्यांचे वास्तव्य आळेफाटा येथे होते. काल अलिबाग येथे असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच हृदयविकाराने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.







