एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कुऱ्हा येथे अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी हालचालींना वेग; महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडून सकारात्मक आश्वासन

कुऱ्हा येथे अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी हालचालींना वेग; महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडून सकारात्मक आश्वासन

प्रतिनिधी | सय्यद मुजाउद्दीन

 

मुक्ताईनगर : कुऱ्हा परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या कुऱ्हा अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या स्थापनेचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपचे नेते अशोक कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली कुऱ्हा परिसरातील गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
यावेळी शिष्टमंडळाने कुऱ्हा येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबतचे निवेदन महसूलमंत्र्यांना सादर केले. कुऱ्हा परिसर भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून अनेक गावे मुख्यालयापासून दूर आहेत. त्यामुळे नागरिकांना महसुली कामांसाठी मुक्ताईनगर तहसील कार्यालयात वारंवार जावे लागते. स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय झाल्यास या भागातील नागरिकांना महसुली सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होतील, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.
निवेदनात कुऱ्हा परिसरातील नागरिकांना महसूल दाखले, जमीनविषयक कामे, फेरफार, विविध शासकीय दाखले तसेच इतर महसुली सेवांसाठी होणारा वेळ व प्रवासाचा त्रास कमी होईल, असे नमूद करण्यात आले आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शवत लवकरच कुऱ्हा अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या मंजुरीबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.

या भेटीमुळे कुऱ्हा परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिष्टमंडळात अशोक कांडेलकर यांच्यासह कुऱ्हा परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link