एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जळगाव जिल्ह्यात वायर, कृषी मोटार व सोलर पॅनेल चोरीविरोधात विशेष मोहीम

जळगाव जिल्ह्यात वायर, कृषी मोटार व सोलर पॅनेल चोरीविरोधात विशेष मोहीम

धुळे, नंदुरबारसह मध्य प्रदेशातील पोलिसांशी समन्वय; २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान विशेष कारवाई

जळगाव : जिल्ह्यात कृषी पंप, तांब्याची वायर, महावितरणची वायर तसेच सोलर पॅनेल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांकडून विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनांमध्ये आंतरजिल्हा तसेच आंतरराज्यीय संबंध असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून व्यापक स्तरावर समन्वय साधण्यात येत आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत दि. २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी वायर, कृषी मोटार आणि सोलर पॅनेल चोरीविरोधात विशेष कारवाई करण्यात येत आहे. यासाठी जळगाव पोलिसांकडून धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, नाशिक ग्रामीण आणि जालना जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील खरगोन, बुऱ्हाणपूर आणि बडवानी जिल्ह्यांच्या पोलिसांशी समन्वय साधण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक प्रतिबंधात्मक व तपासात्मक कारवाईबाबत सूचना दिल्या आहेत.

चोरीच्या हॉटस्पॉटचे मॅपिंग

या मोहिमेत पोलीस स्टेशननिहाय चोरीच्या घटनांचे हॉटस्पॉट मॅपिंग करण्यात येत आहे. चोरीची वेळ, चोरीची पद्धत, वापरलेली वाहने, तांब्याची वायर किंवा केबलचे प्रमाण व प्रकार, चोरीचा मार्ग तसेच इतर महत्त्वाच्या बाबींचे विश्लेषण केले जात आहे.

भंगार व्यावसायिकांवर विशेष लक्ष

जिल्ह्यातील प्रमुख भंगार व्यावसायिकांची यादी तयार करून त्यांची तपासणी व चौकशी करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात होणारी तांब्याची खरेदी-विक्री, संशयास्पद व्यवहार तसेच चोरीच्या मालाची संभाव्य विल्हेवाट यावर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

भंगार बाजारपेठ तसेच संवेदनशील भागांमध्ये गोपनीय माहितीचे नेटवर्क अधिक मजबूत करण्यात येणार असून, यासाठी कार्यक्षम पोलीस अंमलदारांची विशेष नियुक्ती केली जात आहे.

सोलर प्रकल्पांची सुरक्षा वाढविण्यावर भर

जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी सोलरवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. संवेदनशील भागातील सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे आणि आवश्यकतेनुसार तांत्रिक डेटाचे विश्लेषण करून संशयित व्यक्ती, वाहने व त्यांच्या हालचालींची माहिती संकलित केली जात आहे.

तसेच जिल्ह्यातील सोलर कंपन्या व प्रकल्प व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था आणि रात्रीच्या वेळी सर्च लाईट असलेल्या सुरक्षा वाहनांची गस्त ठेवण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

सराईत आरोपींचा स्वतंत्र डेटाबेस

वायर, कृषी मोटार आणि सोलर पॅनेल चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपींचा स्वतंत्र डेटाबेस तयार करण्यात येत आहे. संबंधित आरोपींचे सध्याचे वास्तव्य, साथीदार, पूर्वीचे गुन्हे आणि हालचालींची माहिती तपासली जाणार आहे. आवश्यकतेनुसार कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून घरझडती व इतर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.

जिल्ह्यात दाखल असलेल्या संबंधित एफआयआरचे तुलनात्मक विश्लेषण करून चोरीच्या घटनांमधील समान बाबी शोधल्या जात आहेत. यात मोटारीचा प्रकार, वायर कापण्याची पद्धत, चोरीची वेळ, वापरलेली साधने, पळून जाण्याचा मार्ग तसेच चोरीचा माल विक्री किंवा विल्हेवाट लावण्याची संभाव्य ठिकाणे यांचा अभ्यास केला जात आहे.

गावपातळीवरील सुरक्षा यंत्रणा सक्रिय

या प्रकारच्या चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस पाटील यांचे विशेष प्रबोधन करून गावातील संशयास्पद हालचालींकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. संशयित व्यक्ती किंवा वाहनांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संवेदनशील गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल अधिक सक्रिय व सक्षम करण्यात येणार असून, विशेष मेळाव्यांद्वारे रात्रीची गस्त, संशयित हालचालींची नोंद आणि पोलिसांशी त्वरित संपर्क याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. आवश्यकतेनुसार ग्राम सुरक्षा दलाला टॉर्च व इतर मूलभूत साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पाणी स्रोतांच्या परिसरात रात्रीची गस्त

विहिरी, तलाव, कालवे, नदीकाठ तसेच इतर पाणी स्रोतांच्या परिसरातील शेतांमध्ये रात्रीची गस्त वाढविण्यात येत आहे. या संवेदनशील ठिकाणी नियमित तसेच अनपेक्षित पेट्रोलिंग करण्यावर पोलिसांकडून भर देण्यात येत आहे.

वायर, कृषी मोटार आणि सोलर पॅनेल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, तांत्रिक तपास, आंतरजिल्हा समन्वय आणि गावपातळीवरील सुरक्षा यंत्रणा अशा विविध पातळ्यांवर जळगाव पोलिसांकडून ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link