लालबागच्या राजाच्या चरणी १४ मीटरचा शेला अर्पण करत ‘तनिष्का मल्टी बिझनेस ग्रुप’चा शुभारंभ
प्रतिनिधी -सारंग महाजन.
महिला सशक्तिकरण, व्यवसाय कौशल्य आणि उद्योजकांना व्यासपीठ देण्याचा संकल्प
मुंबई : श्रद्धा, परंपरा आणि नव्या व्यवसायिक संकल्पनेचा अनोखा संगम घडवत *‘तनिष्का मल्टी बिझनेस ग्रुप’* चा शुभारंभ २५ सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाच्या चरणी १४ मीटर लांबीचा शेला अर्पण करून करण्यात आला.
नव्या व्यवसायाची सुरुवात विघ्नहर्त्या गणरायाच्या आशीर्वादाने व्हावी, तसेच या माध्यमातून महिला सशक्तिकरणाला चालना मिळावी, महिलांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि व्यवसायिकांना व्यवसाय वाढीसाठी एक सक्षम व्यासपीठ मिळावे, या संकल्पनेतून हा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी तनिष्का मल्टी बिझनेस ग्रुपचे CEO व Founder प्रसाद सोनवणे, आकाश शिरसाठ, संपूर्ण मॅनेजमेंट टीम तसेच सहकारी वर्ग उपस्थित होता.
*१४ मीटरच्या शेल्यामागची मेहनत*
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेला हा शेला केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून त्यामागे मेहनत, वेळ, कौशल्य आणि भावनेची एक वेगळीच कहाणी आहे.
या संपूर्ण १४ मीटर लांबीच्या शेल्याचे शिवणकाम भालचंद्र सोनवणे यांनी केले. साधारण पाच ते सहा दिवसांच्या कालावधीत या शेल्याचे शिवणकाम पूर्ण करण्यात आले. व्यवसायाच्या शुभारंभासाठी काहीतरी वेगळे, मनापासून आणि कायम स्मरणात राहील असे करण्याची इच्छा होती. त्यातूनच लालबागच्या राजाच्या चरणी शेला अर्पण करण्याचा संकल्प करण्यात आला.
या शेल्याचा प्रत्येक टाका म्हणजे मेहनतीचे प्रतीक आणि प्रत्येक घडी म्हणजे नव्या सुरुवातीची भावना, अशा भावनेने हा उपक्रम पूर्ण करण्यात आला.
*तरुण विचारातून उद्योजकतेकडे…*
प्रसाद सोनवणे या तरुण उद्योजकाच्या संकल्पनेतून ‘तनिष्का मल्टी बिझनेस ग्रुप’ आकार घेत आहे. केवळ स्वतःचा व्यवसाय उभा करणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, महिलांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे, व्यवसाय कौशल्य विकसित करणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि व्यवसायिकांना एकमेकांशी जोडणारे व्यासपीठ निर्माण करणे, ही व्यापक संकल्पना या ग्रुपमागे आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात व्यवसाय सुरू करण्याची इच्छा अनेकांकडे असते; मात्र योग्य मार्गदर्शन, संधी, नेटवर्क आणि व्यासपीठाची कमतरता जाणवते. हीच गरज लक्षात घेऊन तनिष्का मल्टी बिझनेस ग्रुपच्या माध्यमातून “संधीपासून व्यवसायाकडे आणि व्यवसायापासून प्रगतीकडे” असा प्रवास घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
*श्रद्धेपासून व्यवसायाच्या नव्या पर्वाची सुरुवात*
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेला १४ मीटरचा शेला हा या नव्या प्रवासाचा केवळ शुभारंभ नसून, विश्वास, मेहनत, एकजूट आणि मोठे स्वप्न पाहण्याची सुरुवात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
गणरायाच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा व्यवसाय भविष्यात अनेक महिला, नवउद्योजक आणि व्यवसायिकांना जोडत एक सक्षम व्यावसायिक समुदाय निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
‘तनिष्का मल्टी बिझनेस ग्रुप’ व्यवसायाची नवी संधी, नव्या पिढीची नवी दिशा.







