एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने मागितली २० लाखांची लाच

पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने मागितली २० लाखांची लाच; ५० हजार घेताना ACBच्या जाळ्यात; रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची दिली धमकी!

 

प्रतिनिधी महालिंग स्वामी

 

रुग्णालयातील कथित अनियमिततेवर कारवाई न करण्यासाठी आणि वरिष्ठांकडे अहवाल न पाठविण्याच्या मोबदल्यात चक्क २० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आणि त्यापैकी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे महानगरपालिकेच्या (PMC) क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०, वर्ग-२, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय) असे जाळ्यात अडकलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. ACBच्या पुणे पथकाने शुक्रवारी (२६ सप्टेंबर २०२६) धानोरी येथील रुग्णालयात सापळा रचून ही धडक कारवाई केली.

तक्रारदाराच्या रुग्णालयातील कामकाजाबाबत नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात एक तक्रार अर्ज प्राप्त झाला होता, ज्याची चौकशी डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांच्याकडे होती. १८ सप्टेंबर रोजी चकोर यांनी रुग्णालयाची पाहणी करून त्रुटींचे निराकरण न केल्यास ‘रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवेन’ अशी धमकी दिली आणि हा अहवाल न पाठवण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी ३० हजार रुपये घेण्यात आले होते.

या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने २१ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पुणे कार्यालयात तक्रार दाखल केली. २४ सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणीत डॉ. चकोर यांनी स्वतःसाठी आणि ‘साहेबांसाठी’ ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, तसेच यापूर्वी १५ हजार रुपये घेतल्याचेही समोर आले.

 

त्यानुसार २६ सप्टेंबर रोजी दुपारी धानोरी, भैरवनगर येथील तक्रारदाराच्या रुग्णालयाच्या केबिनमध्ये सापळा रचण्यात आला. यावेळी डॉ. चकोर यांनी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक निता मिसाळ व सतीश वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

#ACBPune #PunePMC #AntiCorruptionBureau #BriberyCase #Dhanori

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link