एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

८०० रुपयांच्या व्यवहारातून मामेभावाचा खून; मृताचे दात तोडून बॅगेत ठेवले

८०० रुपयांच्या व्यवहारातून मामेभावाचा खून; मृताचे दात तोडून बॅगेत ठेवले

उप संपादक | प्रणित काठोके

भडगाव परिसरातील धक्कादायक घटना; आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

भडगाव : रुद्राक्ष विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून पारधी समाजातील एका व्यक्तीचा त्याच्याच नातेवाईकाने दगडाने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना भडगाव परिसरात घडली. खून केल्यानंतर आरोपीने मृताच्या तोंडातील दात दगडाने तोडून ते बॅगेत ठेवल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपीकडील बॅगेत दोन जिवंत कबुतरेही आढळून आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मृताचे नाव धर्मा जुगा पवार (वय ४०), तर आरोपीचे नाव जुगा कांतिलाल पवार (वय ३०) असल्याची माहिती आहे. दोघेही गावोगावी फिरून रुद्राक्ष विक्री करीत असल्याचे समोर आले आहे.

८०० रुपयांच्या व्यवहारावरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मा पवार यांनी रुद्राक्ष विक्रीतून सुमारे ८०० रुपये मिळवले होते. त्यानंतर दोघे नवरदेवळा रेल्वे स्थानक परिसरात सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी पैशांच्या वाटणीवरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपीने धर्मा पवार यांच्यावर दगडाने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात धर्मा पवार यांचा मृत्यू झाला.

पोलिसांना कुत्र्यांच्या भुंकण्याने मिळाला आरोपीचा ठाव

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील शेताजवळ कुत्रे भुंकत असल्याचा आवाज पोलिसांना ऐकू आला. त्या दिशेने पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी दारूच्या नशेत तेथे बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

बॅगेत मृताचे दात आणि दोन जिवंत कबुतरे

आरोपीच्या बॅगेची झडती घेतली असता मृताच्या तोंडातील दगडाने तोडलेले दात आढळून आल्याची माहिती आहे. त्याच बॅगेत दोन जिवंत कबुतरे देखील आढळून आली. आरोपीने ही कबुतरे खाण्यासाठी आणल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आल्याचे वृत्त आहे.

या घटनेमुळे भडगाव परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. खुनामागील नेमका घटनाक्रम, पैशांच्या व्यवहाराचा वाद आणि हल्ल्यानंतर आरोपीने केलेल्या कृत्याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link