एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या इसमाच्या वालचंद नगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या इसमाच्या वालचंद नगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी मच्छिंद्र करे

 

गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत राऊंड जवळ बाळगणारा इसम वालचंदनगर

पोलीसांकडुन जेरबंद

गणेशउत्सव २०२६ हा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्हामध्ये मा. श्री. संदीपसिंह गिल्ल साो पोलीस अधीक्षक यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार, आरोपी यांच्या हालचालीवर लक्ष ठेवुन त्यांना वेळोवेळी चेक तसेच अवैधरित्या अग्निशस्त्रे व इतर शस्त्रे बाळगणा-या इसमांवर देखील कारवाई करण्यासाठीचे गुन्हे आढावा बैठकीत आदेश दिले होते. त्यानुसार वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार, आरोपी यांना गणेशउत्सवाच्या अनुषंगाने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवुन त्यांना वेळोवेळी चेक करणे सुरू होते.

वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गणेशउत्सवाच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक १७/०९/२०२६ रोजी रात्री २०/०० वा. दरम्यान वालचंदनगर पोलीस स्टेशन कडील पोहवा २०५३ गणेश काटकर व पोहवा १८५५ गणेश झरेकर हे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मौजे बेलवाडी, ता. इंदापुर येथील इंदापुर बारामती रोडलगत बेलवाडी फाटा परिसरात पांढरा शर्ट व काळी पैंट परिधान केलेला एक इसम कमरेला पॅन्टमध्ये गावठी पिस्टल लावुन फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच पोलीस पथकाने पंचासह बेलवाडी फाटा परिसरात जाऊन शोध घेतला असता बेलवाडी बस स्टैंडजवळ मिळालेल्या माहिती मधील इसम आढळुन आला. त्यावेळी त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव चेतन राजु लोंढे, वय २० वर्षे, रा. बोरी, ता. इंदापुर, जि. पुणे असे सांगितले. त्यावेळी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्टमध्ये लपवुन ठेवलेले बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्टल व पॅन्टच्या खिशामध्ये एक जिवंत राऊंट मिळुन आल्याने तो लागलीच दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

तरी सदर आरोपी नामे चेतन राजु लोंढे, वय २० वर्षे, रा. बोरी, ता. इंदापुर, जि. पुणे याच्याकडे अवैध गावठी पिस्टल व जिवंत काडतुस मिळुन आल्याने गणेश काटकर, पोलीस हवालदार २०५३ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वालचंदनगर पोलीस स्टेशन गु. रजि. नंबर २९४/२०२६ ऑर्म अॅक्ट ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास गणेश झरेकर, पोलीस हवालदार १८५५, वालचंदनगर पोलीस स्टेशन हे करत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. संदीपसिंह गिल्ल सो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा. श्री. चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे गोपाळ पवार पोलीस निरीक्षक, अविनाश घोरपडे पोलीस उप-निरीक्षक तसेच पोलीस हवालदार गणेश काटकर, गणेश झरेकर, किर्तीलाल गायकवाड, अमोल गायकवाड, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर, अजित राऊत यांनी केली आहे. सदर कामगिरी बद्दल वरिष्ठ अधिकारी यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link