एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अर्जुन पुरस्कार विजेत्या अदिती गोपीचंद स्वामी यांची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात ‘गट-अ’ पदावर निवड

अर्जुन पुरस्कार विजेत्या अदिती गोपीचंद स्वामी यांची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात ‘गट-अ’ पदावर निवड

प्रतिनिधी महालिंग स्वामी

सातारा : सातारची कन्या, अर्जुन पुरस्कार विजेत्या आणि राष्ट्रीय जंगम संघटनेच्या ब्रँड अँबेसिडर कु. अदिती गोपीचंद स्वामी यांची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी (गट-अ / Class-I) या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रीय जंगम संघटनेतर्फे सातारा येथील हॉटेल फर्न रेसिडेन्सी येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय जंगम संघटनेचे राष्ट्रीय सचिव श्री. चंद्रशेखर स्वामी हुंडेकेरी, लातूर यांच्या वतीने अदिती स्वामी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कु. अदिती गोपीचंद स्वामी यांनी मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट क्रीडा कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात गट-अ पदावर जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे.

 


या सत्कार समारंभास राष्ट्रीय जंगम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. श्रावण भैया जंगम, प्रसिद्ध डॉक्टर श्री. अभिषेक स्वामी, लोणंद येथील प्रसिद्ध व्यापारी श्री. उदयकुमार जंगम, श्री. गोपीचंद स्वामी सर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, समाजबांधव आणि मान्यवर उपस्थित होते.
खासदारांकडून दूरध्वनीवरून अभिनंदन
अदिती स्वामी यांच्या यशाबद्दल सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
अदिती गोपीचंद स्वामी यांचे हे यश त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वासोबतच सातारा आणि जंगम समाजासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीनंतर महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाल्याने त्यांच्याकडून भविष्यातही उल्लेखनीय कार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय जंगम संघटनेतर्फे कु. अदिती गोपीचंद स्वामी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link