एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अकोला-दर्यापूर मार्गावर बेकायदेशीर इथेनॉल साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

अकोला-दर्यापूर मार्गावर बेकायदेशीर इथेनॉल साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

आपातापा हद्दीतील शेडवर छापा; २० इथेनॉलचे भरलेले बॅरेल, ४१ रिकामे बॅरेल जप्त

अकोला जिल्हा प्रतिनिधी निळकंठ वसू 7820899963, दि. १ सप्टेंबर २०२६ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अकोला-दर्यापूर रोडलगत आपातापा गावाच्या हद्दीत एका शेडमध्ये बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या मोठ्या प्रमाणातील इथेनॉलवर धडक कारवाई केली. या कारवाईत २०० लिटर क्षमतेचे इथेनॉलने भरलेले २० प्लास्टिक बॅरेल तसेच इथेनॉलचा वास असलेले २०० लिटर क्षमतेचे ४१ रिकामे बॅरेल जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ४२ हजार रुपये असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला दि. १ सप्टेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली होती. आपातापा गावाच्या हद्दीत अकोला-दर्यापूर रोडलगत असलेल्या एका शेडमध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने पेट्रोलसह इथेनॉलचा मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठा करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर विभागाने तातडीने कारवाई केली.

दोन पंचांच्या उपस्थितीत शेडवर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान इथेनॉलने भरलेले २० बॅरेल आणि इथेनॉलचा वास असलेले ४१ रिकामे बॅरेल आढळून आले. या कारवाईदरम्यान २ हजार ९४५ लिटर अवैध पेट्रोलचा साठाही मिळून आला. हा पेट्रोल साठा पुढील कारवाईसाठी राज्य पुरवठा विभागाचे निरीक्षक तथा पुरवठा अधिकारी विश्वजित लिंगायत तसेच पुरवठा निरीक्षक तुषार चिंचोले यांच्या ताब्यात देण्यात आला.

२८ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी सय्यद अजहर सय्यद ताहिर (वय २८), रा. वीर लहुजी नगर, इंदिरा गांधी पुतळा, अकोट फैल, अकोला याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याची फिर्याद राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान अमर गोवर्धन इंगळे यांनी दिली असून, पुढील तपास देवेश कोटे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, अकोला करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर यांच्या सूचनेनुसार तसेच अकोला राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सीमा झावरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत निरीक्षक प्रमोद कांबळे, निरीक्षक गणेश जाधव, तसेच दुय्यम निरीक्षक आणि जवानांच्या पथकाने सहभाग घेतला. अमरावती विभागीय भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही कारवाईदरम्यान सहकार्य केले.

अवैध दारूविषयक माहिती देण्याचे आवाहन

अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत नागरिकांकडे कोणतीही माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विभागाने यासाठी टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ९९९९, व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ तसेच दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६३८८१९ उपलब्ध करून दिले आहेत.

अवैध इथेनॉल व पेट्रोल साठ्याविरोधातील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठवणुकीवर विभागाकडून आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link