एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

अहिल्यानगर : शहरात अवैधरीत्या मावा व सुगंधित तंबाखू तयार करून विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. दोन ठिकाणी छापे टाकून इलेक्ट्रिक मशीन, सुगंधित तंबाखू, मावा व इतर साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
अहिल्यानगर शहरातील सुगंधित तंबाखू व मावा तयार करून विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत इलेक्ट्रिक मशीन, वजनकाटा, सुगंधित तंबाखू, मावा, सुपारी तसेच मावा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून प्रकरणाचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.
अवैध मावा, सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link