एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शिरूर पोलिसांची एमडी तस्करांवर मोठी कारवाई; 56 ग्रॅम एमडीसह 11.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरूर पोलिसांची एमडी तस्करांवर मोठी कारवाई; 56 ग्रॅम एमडीसह 11.90 लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

शिरूर : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि शिरूर पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाईची धडक मोहीम सुरू ठेवत शिरूर परिसरात मोठी कारवाई केली. या कारवाईत 56 ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ, मोटारसायकल व दोन मोबाईल फोन असा एकूण 11 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला अमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.
दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून प्रदीप विठ्ठल कोरेकर, रा. न्हावरा, ता. शिरूर आणि साईनाथ जनार्दन भोसेकर, वय 35 वर्षे, रा. कारेगाव, ता. शिरूर यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून 56 ग्रॅम वजनाचे एमडी अमली पदार्थ (किंमत 11 लाख 20 हजार रुपये), मोटारसायकल (30 हजार रुपये) आणि दोन मोबाईल फोन, असा एकूण 11 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 769/2026, एनडीपीएस कायदा कलम 8(क), 21(ब), 22(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीही शिरूर परिसरात अमली पदार्थविरोधी कारवाया केल्या आहेत. 18 ऑगस्ट रोजी 110 ग्रॅम एमडीसह 22 लाख रुपयांचा मुद्देमाल, तर 19 ऑगस्ट रोजी 20 ग्रॅम एमडीसह सुमारे 9 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
कारवाईतील पोलीस अधिकारी व कर्मचारी
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, शिरूर पोलीस ठाण्याचे सपोनि. प्रशांत दिवटे, स्था. गु. शा.चे पोसई महेश डोंगरे, पोसई सागर शेळके, पोलीस अंमलदार संजय पडवळ, पो. हवालदार तुषार पंदारे, पो. हवालदार जनार्दन शेळके, पो. हवालदार संजू जाधव, पो. हवालदार राजू मोमीन, पो. हवालदार विकास पाटील, पो. शि. सागर धुमाळ तसेच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार बाळू भवर, गिराम व चितारे यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतरपणे सुरू आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना आपल्या परिसरात अमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक होत असल्यास पोलिसांना गोपनीय माहिती देण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link