एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भवरापुरच्या ओढ्यालगत विषारी गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; पोलिसांना पाहताच महिला आरोपीची झाडीतून धूम!

भवरापुरच्या ओढ्यालगत विषारी गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; पोलिसांना पाहताच महिला आरोपीची झाडीतून धूम!

उपसंपादक गणेश महाडिक

उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील भवरापुर गावच्या हद्दीत टिळेकरवाडी व भवरापुरच्या शिवेवर, ओढ्यालगत सुरू असलेल्या कथित विषारी हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे १२ हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य व तयार दारू जप्त केली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच महिला आरोपीने भाबळीच्या झाडीतून पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास भवरापुर गावच्या हद्दीत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यभामा सुदामा राजपुत, रा. खामगाव टेक, ता. हवेली, जि. पुणे ही महिला ओढ्यालगत हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भट्टी पेटवून साहित्य जवळ बाळगून असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपी महिलेने भाबळीच्या झाडीतून पळ काढला.
कारवाईमध्ये एक लोखंडी पत्र्याचा बॅरल व त्यामध्ये अंदाजे १०० लिटर काळपट जळके रसायन, एक निळ्या रंगाचा ड्रम व त्यामध्ये अंदाजे ६० लिटर कच्चे रसायन, चुलीवर ठेवलेल्या टाकीवरील अॅल्युमिनियमचे झाकण, अॅल्युमिनियमचा चाटू, प्लास्टिक कॅनमध्ये अंदाजे ५ लिटर तयार गावठी हातभट्टी दारू तसेच अंदाजे २५ किलो लाकूड असा एकूण १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल काजल संग्राम कांबळे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ६५ (क), (फ), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक खोमणे करीत असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सहाय्यक फौजदार भोसले यांनी केली.
पोलिसांच्या कारवाईनंतरही आरोपी महिला फरार असून तिचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. हवेली तालुक्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link