एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जळगाव एलसीबी व एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई; 62.07 ग्रॅम एमडीसह एक आरोपी जेरबंद, ₹3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव एलसीबी व एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई; 62.07 ग्रॅम एमडीसह एक आरोपी जेरबंद, ₹3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त

उप संपादक | प्रणित काठोके

अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत एमडी (Mephedrone) या घातक अमली पदार्थासह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत एकूण 62.07 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला असून मोबाईल फोन व मोटारसायकलीसह ₹3 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या दुसऱ्या आरोपीचाही सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 31 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 10.40 वाजता, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीतील वखार महामंडळ (एफसीआय गोडाऊन), सेक्टर क्रमांक A-14 समोरील रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखा व एम.आय.डी.सी. पोलीसांचे पथक गस्त घालत असताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एमडी (Mephedrone) हा मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक अमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर आरोपीला अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इम्रान खान हयात खान (वय 36 वर्षे) असे असून तो मूळचा आडगाव, ता. जळगाव येथील रहिवासी असून सध्या करीम नगर, फातिमा नगर, एम.आय.डी.सी., जळगाव येथे वास्तव्यास आहे.

तपासादरम्यान रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याने संबंधित एमडी विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे संपूर्ण नाव व इतर तपशील तपासाधीन आहेत.

पोलीसांनी आरोपीकडून 39.06 ग्रॅम एमडी (किंमत ₹1,96,000), 11 प्लास्टिक पिशव्यांमधील 9.10 ग्रॅम एमडी (किंमत ₹36,000) तसेच 18 प्लास्टिक पिशव्यांमधील 13.91 ग्रॅम एमडी (किंमत ₹56,000) असा एकूण 62.07 ग्रॅम एमडी (एकूण किंमत ₹2,88,000) जप्त केला. याशिवाय रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन (₹20,000) आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (₹50,000) जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ₹3,58,000 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 635/2026 अन्वये अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act, 1985) कलम 8(क), 22(क), 29 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सहाय्यक पोलीस फौजदार अतुल रघुनाथ वंजारी (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे पुढील तपास करीत आहेत.

जळगाव जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अमली पदार्थांच्या अवैध व्यापारासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास निर्भयपणे पोलिसांना कळवावी. समाजाला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस आणि नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link