एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अचानक नगर, गेवराई येथे राहत्या घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा

अचानक नगर, गेवराई येथे राहत्या घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा

पीडित महिलांची सुटका;दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल.बीड मधील काही लॉजची पोलिसांनी झाडाझडती घ्यावी

प्रतिनिधी संगीता ईनकर

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) बीड यांची कारवाई तीन पिडीत महिलांची सुटका.

याविषयी सविस्तर बातमी अशी की. अनैतिक वाहतुक प्रतिबंध कक्ष बीडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांना दिनांक 08/07/2026 रोजी सकाळी गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की. पोलीस ठाणे गेवराई हद्दीत अचानक नगर येथे बाहेर जिल्ह्यातून महिलांना बोलावून, वेश्या व्यवसाय करीत आहेत अशी माहिती प्राप्त झाली सदरची माहिती ही वरिष्ठांना देण्यात आली त्यावरून वरिष्ठांनी पोलीस निरीक्षक निलेश एकनाथ केळे, सायबर, पोलीस ठाणे बीड व सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांना AHTU टीमसह सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले. त्यावरून सायबर पोस्ट चे प्रभारी केळे सर व अ. मा. वा. प्र. कक्षाच्या प्रमुख व स्टाफसह तसेच डमी ग्राहक व दोन शासकीय पंचासह सापळापूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेले. डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या महिला एजंटने वेश्या गमनासाठी होकार देवून त्यासाठी 1000 रुपयांची मागणी केली. डमी ग्राहकाने ठरल्या प्रमाणे रक्कम देवून पोलीस पथकास ठरलेला इशारा केला असता, पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. पैसे स्वीकारलेल्या महिलेला तिचे नाव गाव विचारले असता, तिने तिचे नागरबाई लक्ष्मण हातागळे रा. रामतीर्थ, बीड ह. मुक्काम अचानक नगर, गेवराई असे सांगितले. सदर महिलेची पंचासमक्ष झडती घेतली असता, डमी ग्राहकाने दिलेली नमूद वर्णनाची 500 रू. दराची दोन नोट मिळून आल्याने ती पंचासमक्ष जप्त केली सदर ठिकाणी तीन पीडित महिला मिळून आल्या त्यापैकी डमी ग्राहकासोबत रूम मधे मिळून आलेल्या पीडीत महिलेला विश्वासात घेवून चौकशी केली असता तीने सांगितले की, ती जिल्हा नांदेड ची असून, तिला नागरबाई लक्ष्मण हातागळे व घर मालकीण शांताबाई सतीश पवार या महिलेने वेश्याव्यवसाय करण्यासाठी इथे बोलवून घेतले आहे. तसेच अन्य महिलांना बोलावून घेऊन प्रत्येक ग्राहकाकडून 1000 रू घेतात व त्यापैकी आम्हाला 500 रु देतात. अशाप्रकारे आमच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे सांगितले. तसेच रुमची झडती घेतली असता 21 विना वापरलेले निरोध मिळून आले आहे.

नमुद आरोपी हे पीडीत महिलांना, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बोलावून घेऊन, स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करुन वेश्याव्यवसाय करण्यास लावले व त्याच कमाईवर स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे व सदर महिलांचे शोषण करण्याच्या उद्देशाने बोलावले म्हणून त्यांच्या विरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ कलम ३.४.५६ व सह कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक निलेश केळे, सहायक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मीरा रेडेकर, उषा चौरे, महीला पोलीस हवालदार शोभा जाधव पोलीस हवालदार अशोक शिंदे, प्रदीप येवले, मपोशी सविता चव्हाण, भाऊसाहेब कारले संदीप गर्जे सर्व नेमणूक व अ. मा. वा. प्र. कक्ष बीड यांनी केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link