मुक्ताईनगरात शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन; पत्रकारांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
उप संपादक | प्रणित काठोके
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुक्ताईनगरतर्फे खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांना केलेल्या कथित अर्वाच्य शिवीगाळीचा तीव्र निषेध करण्यात आला. यासंदर्भात तहसीलदार मुक्ताईनगर यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे समाजाचे डोळे आणि कान असून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडणे हे त्यांचे कर्तव्य आहे. अशा पत्रकारांचा अपमान करणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली करण्यासारखे आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारची असंसदीय भाषा अपेक्षित नसून, या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस शासकीय कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधितांवर तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन बळीराम गोसावी, तालुका प्रमुख ॲड. राहुल पाटील, तालुका समन्वयक ॲड. देवेंद्र बोदडे, तालुका संघटक वसीम पिंजारी, ॲड. अशोक बोदडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.








