धाराशिव जिल्हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला; निष्ठेच्या महासागराने पुन्हा दाखवून दिली ताकद..
प्रतिनिधी लाडलेसाब नदाफ
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव येथे पार पडलेला शिवसेनेच्या निष्ठावंतांचा भव्य मेळावा अभूतपूर्व उत्साह, प्रचंड गर्दी आणि भगव्या जल्लोषात पार पडला..
या मेळाव्यास शिवसेना नेते युवासेनाप्रमुख, आमदार आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत, शिवसेना नेते विनायकजी राऊत, आ. अंबादासजी दानवे, खासदार अरविंदजी सावंत, खासदार अनिलजी देसाई आदींसह मेळाव्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक, पदाधिकारी, महिला भगिनी, युवक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. हजारो शिवसैनिकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. सभास्थळी उसळलेल्या जनसागराने शिवसेनेवरील निष्ठा आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावरील अढळ विश्वास पुन्हा अधोरेखित केला..
धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि यापुढेही अभेद्यच राहणार, यावर हजारो शिवसैनिकांनी आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले..








