एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सासवड पोलिसांची मोठी कारवाई;

सासवड पोलिसांची मोठी कारवाई; २१ लाख ७० हजार ६५० रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

सासवड : सासवड पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांवर सासवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण २१ लाख ७० हजार ६५० रुपये किमतीचा गुटखा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २५/०६/२०२६ रोजी दुपारी सुमारे १.२५ वाजण्याच्या सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे गावच्या हद्दीत कानिफनाथ गडाकडे जाणाऱ्या रोडवर एका गोदामामध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलीस हवालदार २४६८ विशाल जाधव, पोलीस हवालदार १२०८ अभिजीत कांबळे, पोलीस शिपाई २८५५ प्रणय म्हसे, पोलीस शिपाई १४४२ सचिन किवळे, पोलीस शिपाई ३०३५ अक्षय चिले, पोलीस शिपाई ३४३२ पल्लवी काळे यांनी कारवाई करत गोदामाची पाहणी केली.
या ठिकाणी सिग्नेचर फाईन पान मसाला, अँक्शन १ कंपनीचा सुगंधी तंबाखू, आर.के. कंपनीचा सुपर पान मसाला, आर.के. कंपनीचा एस.टी.-२ सुगंधी तंबाखू असा प्रतिबंधित माल आढळून आला.
याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे आरोपी सिराज शेख रा. शितल पेट्रोल पंपाजवळ, कोंढवा खुर्द, पुणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link