अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ३ वर्षे कारावासाची शिक्षा
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
ओतूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, जुन्नर यांनी दोषी ठरवत ३ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दिनांक ११/०९/२०२० रोजी ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घराजवळ कपडे धुण्यासाठी गेली असताना आरोपी रमेश सरदारम ढमढे याने तिचा विनयभंग केला होता. तसेच तिला व तिच्या आजोबांना धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणी ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास तत्कालीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पी.एच. कांबळे यांनी करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले व दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
खटल्याची सुनावणी श्री. एस. बी. शेलार, विशेष न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, जुन्नर यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जी. के. खोडे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
ही कारवाई मा. संदीपसिंग गिल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. शुभम कुमार, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपासामध्ये पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस निरीक्षक संतोष भोळे, सहायक सरकारी वकील पथक, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष भोळे, अंमलदार पोलीस हवालदार मनिषा तान्होरे, पोलीस नाईक मनोज कांबळे, पोलीस हवालदार देविदास खेडकर यांनी कामकाज केले.
पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, महिलांविरुद्ध व अल्पवयीन मुलींविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा मिळवून दिली जाईल
क्राइम बातम्या साठी आपल्या चॅनेल वर व्हिजिट करा
*सायबर गुन्हे शाखा, मुंबई यांची मोठी कारवाई बनावट APK फाईलद्वारे मोबाईल हॅक करून ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश*








