एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नांदेडच्या पोलीस अधीक्षकपदी डॉ. नीलाभ रोहन यांची नियुक्ती; पदभार स्वीकारून कामाला केली सुरुवात

नांदेडच्या पोलीस अधीक्षकपदी डॉ. नीलाभ रोहन यांची नियुक्ती; पदभार स्वीकारून कामाला केली सुरुवात

श्रीहारी अंभोरे पाटील उप संपादक –

 

हिंगोली जिल्हाचे मावळते तर नांदेड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. नीलाभ रोहन यांनी बुधवारी सायंकाळी नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. एका अत्यंत शुभ मुहूर्तावर, म्हणजेच सायंकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी दशमी तिथी संपून एकादशी सुरू होत असताना, त्यांनी जिल्ह्याच्या सुरक्षेची धुरा आपल्या हाती घेतली.नादेड जील्हा हा भोगोलीक दृष्ट्या मोठा असून जिल्ह्याची लोकसंख्या दोन लोकसभा मतदारसंघ अंतर्गत जिल्ह्यां मोठ्या संख्येने लोकसंख्या आहे त्याचबरोबर गेल्या काही अनेक दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे पण हिंगोली जिल्ह्याचे मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक हे आता नांदेड जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने गुन्हेगारी कशी रोखतात याकडे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. नीलाभ रोहन यांनी तात्काळ कामाला सुरुवात केली असून, त्यांनी सर्वप्रथम पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेतली आणि जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत चर्चा केली. विशेष म्हणजे, डॉ. रोहन आणि आयजी शहाजी उमाप यांचा परिचय जुना आहे. यापूर्वी डॉ. नीलाभ रोहन हे हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. हिंगोली हा जिल्हा नांदेड पोलीस परिक्षेत्रांतर्गत येत असल्याने आणि शहाजी उमाप हे या क्षेत्राचे प्रमुख असल्याने, या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय आहे. त्यांच्या या जुन्या ओळखीचा आणि अनुभवाचा फायदा नांदेड जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या बदली प्रक्रियेत मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची बदली झाली आहे. अविनाश कुमार यांनी २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यापूर्वी त्यांनी एक वर्ष अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणूनही याच जिल्ह्यात सेवा बजावली होती. अशा प्रकारे त्यांचा नांदेडमधील एकूण कार्यकाळ सुमारे तीन वर्षांचा राहिला आहे.

डॉ. नीलाभ रोहन यांनी पदभार स्वीकारताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. हिंगोलीतील त्यांच्या काही महिन्यांच्या यशस्वी कामगिरीनंतर आता नांदेड सारख्या मोठ्या आणि संवेदनशील जिल्ह्यामध्ये ते कशा प्रकारे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या नवीन जबाबदारीबद्दल आणि प्रवासासाठी त्यांना सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link