पोलादपूर सुपुत्र समाजसेवक कृष्णा कदम यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
पोलादपूर सुपुत्र समाजसेवक कृष्णा कदम *यांस भारतीय चित्रपट सृष्टीतील इंडियन टेलिव्हिजन अवाॅर्ड 2026 दादासाहेब फाळके पुरस्कार
प्रतिनिधी मुकूंद मोरे
भारतातील अग्रगण्य संस्था असणाऱ्या डी- पिटा चॅरिटेबल ट्रस्ट आणि फिल्मोरा मीडिया नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या व भारतीय चित्रपट सृष्टीतील इंडियन टेलिव्हिजन अवाॅर्ड 2026 दादासाहेब फाळके पुरस्कार डॉ कृष्णा मारुती कदम यांची निवड !
भारतातील अग्रगण्य संस्था असणाऱ्या डी-पिटा चॅरिटेबल ट्रस्ट आणि फिल्मोरा मीडिया नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या व भारतीय चित्रपट सृष्टीतील इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड २०२६ या पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी कृष्णा मारुती कदम यांची निवड झाली आहे.
स्व. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक संबोधले जाते. भारतातील चित्रपट, सामाजिक, क्रीडा, क्षेत्रातील निवडक व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. पोलादपूर सारख्या ग्रामीण भागातील माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीची या सन्मान सोहळ्यासाठी झालेली निवड हे केवळ स्वप्न आहे. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि मी निस्वार्थीपणे केलेली सामाजिक कार्य, रुग्णसेवा यामुळे मला या पुरस्कारासाठी पात्र समजले आहे. बॉलीवूड मधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि हा पुरस्कार माझ्या बरोबर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या पोलादपूर तालुक्यातील जनतेच्या चरणी व रायगड जिल्ह्यातील सर्व जनतेला समर्पित करतो. असे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी शी बोलताना त्यांनी संवाद साधला








