अलिबाग शहर कुंभार आळी येथे कुंभार समाजाच्या वतीने समाज सामाजिक संस्थेची बैठक श्री, अनंत पांडूरंग महाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली
प्रतिनिधी मुकूंद मोरे
कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा रायगड’ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा बैठक संस्थेचे अध्यक्ष श्री अनंत पांडुरंग महाडकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत गोरा कुंभार समाज मंदिर रामनाथ कुंभार आळी अलिबाग शहर या ठिकाणी दिनांक १४/०६/२०२६. रोजी आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम श्री संत गोरा कुंभार काका यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली तसेच अलिबाग तालुका कुंभार समाजाच्या वतीने जिल्ह्यांतून आलेल्या सर्व पदाधिकारी मान्यवरांचा, समाज बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या समाज बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हा सचिव श्री दिलीप साळवी साहेब यांनी मागील इतिवृत्त वाचन करून व जिल्हा समाज भवन साठी जागा संदर्भात समाज बांधवांना मार्गदर्शन केले जिल्हा खजिनदार श्री सुनील अंजार्लेकर यांनी मागील जमाखर्चाचा वाचन करून व माणगाव येथे ४ एप्रिल २०२६. रोजी झालेल्या संस्थेचा चौथा वर्धापन दिनानिमित्त झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन मंजुरी देण्यात आली बैठकीला उपस्थित असलेले विवाह समस्या निवारण समितीचे श्री अध्यक्ष गजानन चौलकर गुरुजी यांनी विवाह समस्या वरती मोलाचं मार्गदर्शन केले जिल्हा युवक अध्यक्ष श्री शरद कुंभार सर यांनी नुकत्याच झालेल्या अलिबाग येथे रायगड जिल्हा कुंभार समाज प्रीमियर लीग २०२६ किक्रेट स्पर्धे बद्दल व कुंभार समाजासाठी सातशे ब्रास रोयल्टी शासनाने माप झाल्याबद्दल माहिती दिली इतर मुद्द्यावर मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच जिल्हा महिला अध्यक्षा सौ.प्रतिभा वाडेकर यांनी महिला संदर्भात मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष श्री अनंत महाडकर यांच्या अध्यक्ष भाषणात जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षना आवाहन केले की आपल्या तालुक्यातून १० व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन शिबीर आयोजित करावी व समाजाच्या विकासासाठी प्रशिक्षण शिबीर आर्टिजन कार्ड कार्यक्रम आयोजित करावेत सदर बैठकीस उपस्थित असलेले जिल्हा का
र्याध्यक्ष श्री रमेश कुंभार, कार्यालय सचिव श्री मधुकर कुंभार, सहखजिनदार श्री अरुण बामणोलकर, जिल्हा
कार्यकारिणी सदस्य श्री प्रवीण कुंभार, श्री रामदास साळवी श्री अरुण म्हशेळकर, श्री नंदकुमार पालवणकर तथा तालुका अध्यक्ष अलिबाग, नगरसेवक माणगाव तथा अध्यक्ष श्री दिनेश रातवडकर, अलिबाग शहर नगरसेविका सौ संध्याताई पालवणकर, कोकण विभागीय उपाध्यक्ष श्री वसंत कुंभार, युवक अध्यक्ष श्री सतिश येलमकर, मिडिया अध्यक्ष श्री योगेश कुंभार, जिल्हा सल्लागार श्री नितीन राजपुरकर, श्री प्रवीण शिरकर, तालुका अध्यक्ष श्री रतन कुंभार, श्री राजेंद्र साळवी, श्री सुनील वाघोसकर, श्री प्रवीण शिरकर, श्री श्याम धाटावकर, श्री शैलेश रातवडकर, नगरसेवक श्री राकेश चौलकर तालुका सचिव श्री रुपेश नागोठणेकर, श्री सुनील कैळकर, तालुका युवक अध्यक्ष श्री रुपेश कुंभार, श्री संतोष भोईलकर, श्री यश मापगावकर, महिला अध्यक्षा सौ वैजयंता उकरुळकर,सौ केतकी नागोठणेकर, जिल्हा सदस्या सौ वर्षा पालवणकर, सौ कविता नागावकर, सौ रेणुका थळकर, सौ रसिका चौलकर, तसेच जिल्ह्यातील समाज बांधव पुरुष, युवक, महिला भगिनी मोठ्या संख्येने हजर होते.अलिबाग रामनाथ मधील समाज बांधवांनी चांगल्याप्रकारे बैठकीचे आयोजन केले होते.बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा युवा अध्यक्ष श्री शरद कुंभार(सर) यांनी आपल्या मार्मिक शब्दात केले.भोजनाची व्यवस्था श्री विलास उकरुळकर यांच्या वतीने करण्यात आली होती.बैठकीला आलेल्या समाज बांधवांचे आभार मानून बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.








