माध्यमांनी संबंधित संघटनांच्या दाव्यांची पडताळणी करूनच बातम्या प्रसारित कराव्यात – सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ या संघटनेनचे नाव काल्पनिक आहे यांची धर्मदाय कार्यालय मध्ये नोद नाही
महाराष्ट्रातील सर्व पत्रकार, वृत्तपत्रे, न्यूज पोर्टल्स आणि वृत्तवाहिन्यांनी कोणत्याही संघटना, पदाधिकारी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांबाबत प्रसिद्ध होणाऱ्या माहितीची सखोल पडताळणी करूनच बातम्या प्रसारित कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी केली आहे.
अनिल पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही संघटना व व्यक्ती विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच सामाजिक पदव्या वापरून जनतेसमोर स्वतःची ओळख निर्माण करत असल्याचे दिसून येते. अशा दाव्यांची सत्यता, संबंधित संस्थांची वैधानिक नोंदणी, तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची पडताळणी होणे आवश्यक आहे.
तसेच काही संघटनांच्या नोंदणीबाबत आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे माध्यमांनी कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित कागदपत्रे, नोंदणीची माहिती आणि अधिकृत स्रोतांची तपासणी करावी, असे त्यांनी नमूद केले.
“धर्म, समाज आणि राज्यातील नागरिकांमध्ये गैरसमज किंवा वाद निर्माण होणार नाहीत यासाठी जबाबदार पत्रकारिता आवश्यक आहे. जनतेपर्यंत केवळ सत्य आणि पडताळणी केलेली माहिती पोहोचली पाहिजे,” असे अनिल पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनतेनेही सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या माहितीवर आंधळा विश्वास न ठेवता तिची सत्यता तपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
– सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील








