पुणे ग्रॅड टुर 2027 मध्ये खेड तालुक्यातील 3 रस्त्यांच्या 21.30 किलोमीटर लांबीच्या कामासाठी 34 कोटी 10 लक्ष रुपये मंजुर
प्रतिनिधी हंसराज पाटील
खेड तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या
वाडा घोडा रस्ता प्रजिमा रस्त्याची रूंदीकरणासहित सुधारणा करणे,
स्पुर डेहणे नायफड ते चिखली फाटा रा.म.61 स्पुर रस्ता रुंदीकरणसहीत सुधारणा करणे,
स्पुर पालखेवाडी कारकुडी ते टोकावडे रस्ता ग्रामा रस्त्याची रुंदीकरणासहीत सुधारणा करणे,या मार्गाच्या रुंदीकरणासह सुधारणा कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
या कामासाठी एकूण अंदाजित 34.10 कोटी रुपये निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
सदर रस्त्याची अवस्था अनेक वर्षांपासून खराब असल्याने परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होणार असून, परिसरातील गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विकासकामासाठी आमदार बाबाजी काळे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
“मतदारसंघातील दर्जेदार रस्ते, सुरक्षित वाहतूक आणि ग्रामीण भागाचा विकास हेच आमचे ध्येय असून, भविष्यातही विकासकामांसाठी प्रयत्न सुरू राहतील,” अशी भावना आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केली.
२०२७ साली होणाऱ्या पुणे ग्रँड टूर च्या पार्श्वभूमीवर मंजूर केलेल्या या भरीव निधीबद्दल माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री महोदयांचे तसेच जिल्हाधिकारी यांचे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार! मानले








