चंदननगर च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अश्विनी जगताप यांनी स्वीकारला पदभार, महिला अधिकाऱ्याची इंट्री !
पुणे शहर संपादक संतोष लांडे
पुणे शहर पोलीस दलात नेहमीच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धमाका दिसून येत असतो. यामध्ये चंदननगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांची बदली करण्यात आली. असून त्यांच्या रिक्त जागेवर युनिट 2 च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे पोलीस निरीक्षक निलेश बडाख हे देखील नेहमीच प्रयत्नशील दिसून आले त्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हेगारांवर चांगलाच वचक ठेवून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील दिसून आले आहेत. मात्र पुन्हा याच पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅशिंग महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी युनिट 2 च्या पदावर आपल्या कामगिरीने पुणे शहरांच्या पोलीस दलात आगळीवेगळी छाप पाडली होती. त्यामुळे त्यांच्या नव्या एन्ट्रीमुळे चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हेगारांवर देखील चांगलाच वचक ठेवला जाणार आहे. आणि कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.








