एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

शहाजी उमाप यांचा भ्रष्टाचारावर सर्जिकल स्ट्राईक: वर्दीला कलंक लावणाऱ्यांची आता खैर नाही

शहाजी उमाप यांचा भ्रष्टाचारावर सर्जिकल स्ट्राईक: वर्दीला कलंक लावणाऱ्यांची आता खैर नाही!नांदेड (प्रतिनिधी)- परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी भ्रष्ट आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध उघडलेली मोहीम आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. त्यांच्या या कडक कारवाईमुळे परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. उमाप यांनी केवळ इशारा देऊन न थांबता, थेट कृती करून हे दाखवून दिले आहे की, कायद्याचे रक्षक जर भक्षक बनले तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही. एलसीबी परभणीच्या पोलीस निरीक्षकांना नांदेड जिल्ह्याची जबाबदारी परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांची थेट नांदेड जिल्हा नियंत्रण कक्षात करण्यात आलेली बदली, हे याच आयर्न फिस्ट कारवाईचे ताजे उदाहरण आहे. त्यांच्यासोबतच शाखेतील ८ ते १० पोलीस अंमलदारांनाही तडकाफडकी  मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अवैध धंदे चालणार नाहीत असा सज्जड दम शहाजी उमाप यांनी वेळोवेळी दिला होता, मात्र तरीही काही अधिकारी आपल्या जुन्या खोडी सोडायला तयार नव्हते. मोदकांचा प्रसाद घेण्याच्या नादात वर्दीच्या कर्तव्याचा विसर पडलेल्या या अधिकाऱ्यांना आता मोठा दणका बसला आहे.येथे एक म्हण तंतोतंत लागू पडते, ती म्हणजे मांजर दूध पिताना डोळे झाकून पिते आणि तिला वाटते की आपल्याला कोणीच पाहत नाही. सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही असेच वाटले असेल की आपले कारनामे कोणाच्या लक्षात येणार नाहीत. पण शहाजी उमाप यांची नजर तीक्ष्ण आहे, त्यांना सर्व काही दिसत आहे. आतापर्यंत केवळ पोलीस हवालदारांवर कारवाई होत होती, पण आता थेट स्थानिक गुन्हा शाखेच्या प्रमुखालाच धारेवर धरल्यामुळे संपूर्ण परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड धडकी भरली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link