शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांची मुंबईत उपस्थिती
मुंबई, प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथील दादर-सायन परिसरातील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमास धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती दर्शविली.
पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उमरगा-लोहारा तालुक्यातील शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर रावसाहेब पाटील, लोहारा खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन बाळू रसाळ, राजकुमार लोखंडे, सायली इंटरप्रायझेसचे प्रतिनिधी, तालुका सर्कल प्रमुख लाडलेसाब, अनिल नाटेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित शिवसैनिकांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघ तसेच उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व सर्व मतदार बांधव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला.
पक्षाच्या ६० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेत, आगामी काळात पक्षसंघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.








