एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वाघी खुर्द येथे एलपीजी गॅस दुर्घटना; एकाच कुटुंबातील दोन गंभीर, पाच किरकोळ जखमी

वाघी खुर्द येथे एलपीजी गॅस दुर्घटना; एकाच कुटुंबातील दोन गंभीर, पाच किरकोळ जखमी
म्हैसही भाजली; तीन घरांचे नुकसान, सुमारे तीन लाख रुपयांची हानी
जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव
वाशिम : रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथे १८ जून ला सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅस गळतीमुळे अचानक आग लागून भीषण दुर्घटना घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील दोन जण गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले असून एका म्हशीलाही भाजल्याने दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित घरातील एलपीजी गॅस यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गॅस गळती झाली. त्यानंतर अचानक आग भडकून घरामध्ये एकच गोंधळ उडाला. आग विझविण्याच्या प्रयत्नात घरातील सदस्य भाजले गेले. दुर्घटनेत तीन घरांचे अंशतः नुकसान झाले असून घरातील साहित्य जळून खाक झाले. तसेच एका म्हशीलाही आगीची झळ बसल्याने ती जखमी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका सेवा तसेच शिरपूर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित यंत्रणांनी तातडीने बचाव व मदतकार्य राबवून आग आटोक्यात आणली. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुर्घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांमध्ये एलपीजी गॅस विमा व नुकसानभरपाईबाबत चर्चा सुरू असून प्रशासनाकडून यासंदर्भात आवश्यक माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, सदर दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित विभागाकडून पंचनामा करण्यात येत असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना एलपीजी गॅसचा वापर करताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link