कैलासवासी डॉ. बाबा आढाव यांच्या जयंतीनिमित्त रिक्षा चालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न
प्रतिनिधी : महालिंग स्वामी
पिंपरी-चिंचवड : समाजसेवक तथा रिक्षा चालकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे कैलासवासी डॉ. बाबा आढाव यांच्या जयंतीनिमित्त छावा वाहन चालक-मालक कामगार संघाच्या वतीने रिक्षा चालक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रिक्षा चालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छावा वाहन चालक-मालक कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ढवळे होते. यावेळी उपाध्यक्ष लक्ष्मणभाऊ शेलार, प्रवक्ते अविनाश जोगदंड, खजिनदार विनायक ढोबळे, कार्याध्यक्ष रवींद्र लंके, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख हिरामण गवारे, रिक्षा पंचायतचे संस्थापक नितीन पवार, शहर पदाधिकारी अशोक मिरगे, उपशहर प्रमुख काशिनाथ शेलार, पिंपरी स्टँड अध्यक्ष हिराभाऊ लांडगे, गणेशभाऊ लोखंडे, विनायक खराडे, शंकर शेरखाने, तुषारभाऊ लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यसम्राट नगरसेवक विकासभाऊ साने, शिक्षण समिती सदस्य व नगरसेवक यशदादा साने तसेच माजी नगरसेवक संजय शेठ नेवाळे यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी रिक्षा चालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबा आढाव यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. शिबिरात रिक्षा चालकांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले.
या उपक्रमामुळे रिक्षा चालक व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा लाभ झाला असून, सामाजिक बांधिलकी जपत छावा वाहन चालक-मालक कामगार संघाने केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.








