एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नळदुर्ग पालिकेत राजकीय भूकंप! भाजपचे नगराध्यक्ष-नगरसेवक ‘लोणावळ्याला’ रवाना; काँग्रेस उमेदवार फिरकेना, निवडणूक एकतर्फी?

नळदुर्ग पालिकेत राजकीय भूकंप! भाजपचे नगराध्यक्ष-नगरसेवक ‘लोणावळ्याला’ रवाना; काँग्रेस उमेदवार फिरकेना, निवडणूक एकतर्फी?

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ.

धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १८ जून रोजी मतदान होत असतानाच, नळदुर्ग शहरातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक ‘मोठी आर्थिक उलाढाल’ आणि ‘तोडपाणी’ करून थेट लोणावळ्याला सहलीवर रवाना झाल्याची चर्चा आहे.! तर दुसरीकडे, काँग्रेसचा उमेदवार साधे मत मागायलाही शहरात फिरकला नसल्याने हा उमेदवार ‘मॅनेज’ झाला की काय? अशी शंका उपस्थित होत आहे. या दोन्ही घडामोडींमुळे ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे मतदारांना फुटू नये म्हणून रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झाले आहे. नळदुर्ग नगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि 11नगरसेवक अचानक गायब झाले असून ते लोणावळ्याला रवाना झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शहरात अशी जोरदार चर्चा आहे की, या नगरसेवकांचे मोठ्या रक्कमेवर तोडपाणी झाले असून, त्यानंतरच ही लोणावळा ट्रिप आयोजित करण्यात आली आहे. या पडद्यामागील आर्थिक उलाढालीची नळदुर्गच्या गल्लीबोळात प्रचंड चर्चा रंगली आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून महेश देशमुख आणि महायुतीकडून बसवराज पाटील हे आमनेसामने लढत आहेत. महायुतीच्या नेत्यांनी नळदुर्ग येथे तब्बल तीन वेळा बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसचे सर्वाधिक १० नगरसेवक नळदुर्ग शहरात असतानाही, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अद्याप नळदुर्गमध्ये साधे तोंड दाखवायलाही तयार नाहीत. त्यांनी स्थानिक नगरसेवकांकडे साधे मतही मागितले नाही. उमेदवाराच्या या संशयास्पद शांततेमुळे आता मतदार आणि नागरिक थेट सवाल करत आहेत: “हा उमेदवार मॅनेज झाला आहे का?पक्षाच्या उमेदवाराकडून मिळणाऱ्या या दुजाभावामुळे आणि दुर्लक्षामुळे नळदुर्गमधील काँग्रेस नगरसेवक अत्यंत नाराज असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आपल्याच पक्षाचा उमेदवार फिरकत नसल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस नगरसेवकांनी या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असून, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.काँग्रेस नगरसेवकांची नाराजी आणि भाजपच्या नगरसेवकांचे लोणावळा गमन यामुळे नळदुर्गमधील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता पूर्णपणे एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १८ जून रोजी होणाऱ्या मतदानात आता काय नाट्य घडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link