एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे सहकारनगर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य : पोलीस अंमलदार संजय मस्के यांची दमदार कामगिरी

पुणे सहकारनगर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य : पोलीस अंमलदार संजय मस्के यांची दमदार कामगिरी

प्रतिनिधी : रितेश सणस

पुणे : पुणे शहरात अल्पवयीन मुले-मुली हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना सहकारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार क्र. 2248 संजय महेंद्र मस्के यांनी आपल्या सहकारी पथकासह उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांतून हरवलेल्या दोन अल्पवयीन मुली व दोन अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात पोलीस अंमलदार संजय मस्के आणि त्यांच्या टीमला यश आले आहे. अथक प्रयत्न, तांत्रिक तपास आणि समन्वयाच्या जोरावर या चारही अल्पवयीन मुलांचा सुरक्षित शोध घेण्यात आला.
या यशस्वी कामगिरीमुळे सहकारनगर पोलीस स्टेशनच्या कार्याची नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून पोलीस अंमलदार संजय मस्के यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी रितेश सणस यांनी संजय मस्के यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, “हरवलेल्या मुलांचा शोध घेणे हे अत्यंत संवेदनशील काम आहे. आमच्या संपूर्ण टीमने सातत्याने प्रयत्न करून या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुरक्षित पोहोचविले. नागरिकांनीही आपल्या मुलांबाबत सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.”
सहकारनगर पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून, पोलीस दलाच्या जनसेवेतील बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.
– अजिंक्य महाराष्ट्र न्यूज

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link