प्रतिनिधी रणजीत मस्के
आज रोजी आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शोध पथकाचे Api मच्छिंद्र कोल्हे व स्टाफ यांना अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई बक्कल नंबर/2108 भाऊसाहेब काकडे यांना 16.30 वाजता गोपनीय माहिती मिळाली, इसम नामे आशिष कुमार झारखंडे प्रसाद वय 22वर्षे दुर्गादेवी पाडा जुने अंबरनाथ गाव अंबरनाथ पूर्व हा विनापरवाना अग्नी शस्त्र बाळगत असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्याने Api मच्छिंद्र कोल्हे यांचे सह Hc/6345 वळवी pc/8373बोडके, pc/3615 केदार असे दोन पंचांसह दुर्गादेवी पाडा परिसरात जाऊन खात्री केली असता इसम नामे आशिष कुमार प्रसाद हा मिळून आला त्याची अंग झडती घेतली असता कमरेस डाव्या बाजूस रिवाल्वर खोचलेल्या स्थितीत मिळून आले त्यानंतर सदर रिवाल्वर चेक केली असता रिवाल्वर चे त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली सदरबाबत जागेवर पंचनामा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे








