एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आर्वी शहरात भूमाफियांच्या टोळीचा धुमाकूळ; नगरपरिषदेच्या कोट्यवधींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न

आर्वी शहरात भूमाफियांच्या टोळीचा धुमाकूळ; नगरपरिषदेच्या कोट्यवधींच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न

प्रतिनिधी | मोहम्मद रशीद खान

 

आर्वी नगरपरिषदेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जागेवर काही व्यक्तींनी अवैधरीत्या अतिक्रमण करून कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गांधी विद्यालयाजवळील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर ९ जून रोजी काही व्यक्तींकडून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिलीप पोटफोडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता तेथे सुरू असलेल्या कामाबाबत चौकशी केली. संबंधित जागा नगरपरिषदेने कोणालाही भाडेतत्त्वावर किंवा लीजवर दिलेली नसल्याचे समोर आले.

याबाबत मुख्याधिकारी डॉ. किरण सुक्कलवार आणि बांधकाम विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ. सुक्कलवार यांनी तत्परता दाखवत नगरपरिषदेच्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेले काम थांबविले तसेच संबंधितांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, असा धमकीवजा फोन एका व्यक्तीकडून आल्याचा आरोपही दिलीप पोटफोडे यांनी केला आहे. शहरातील मोक्याच्या जागांवर पैसा, ताकद, राजकीय आश्रय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माध्यमातून कब्जा करण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विरोध करणाऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते, असे सूचक इशारे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणाविरोधात लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी वर्धा तसेच विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांना निवेदन देण्यात आले असून आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुमितदादा वानखेडे यांनाही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.

अतिक्रमण तात्काळ हटवून संबंधितांवर गुन्हे दाखल न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link