एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

इयत्ता तिसरीतील चिरंजीव भूषण कदम यांची शिवप्रेमी वक्तृत्वाची झेप

इयत्ता तिसरीतील चिरंजीव भूषण कदम यांची शिवप्रेमी वक्तृत्वाची झेप
काष्टी, प्रतिनिधी : अशोक पाचुंदकर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काष्टी येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी चिरंजीव भूषण संजय कदम यांनी आपल्या उत्कृष्ट पाठांतर कौशल्याने आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेल्या आदरभावनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अत्यंत लहान वयातच भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा आणि ऐतिहासिक माहिती प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या मुखोद्गत सादरीकरणातून शिवचरित्राविषयीचा अभ्यास, जिद्द आणि संस्कार स्पष्टपणे दिसून आले.
आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या प्रभावामुळे मुलांचा इतिहास व संस्कारांशी असलेला संबंध कमी होत असताना, भूषण कदम यांच्यासारखे विद्यार्थी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. भविष्यात ते एक उत्कृष्ट वक्ते, व्याख्याते आणि समाजप्रबोधन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून घडू शकतात, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
भूषण यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेचे प्रोत्साहन यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. अशा गुणी विद्यार्थ्यांना शासनाकडून शैक्षणिक तसेच आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, भूषण कदम यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माहिती अधिकारी महाराष्ट्र राज्य मा. सौ. सुशीलाताई मोरे तसेच सीनियर क्राईम रिपोर्टर अशोक पाचुंदकर यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. अशा विद्यार्थ्यांमुळे समाजात इतिहास, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाची जपणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link