एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

तांड्यावरच्या मुलीची PSI पदावर झेप; कु. अनिता बाबुराव राठोड यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

तांड्यावरच्या मुलीची PSI पदावर झेप; कु. अनिता बाबुराव राठोड यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

प्रतिनिधी | विलास चव्हाण

तांड्यावर राहून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कु. अनिता बाबुराव राठोड यांनी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंब, गाव तसेच संपूर्ण समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री. बाबुराव भावजी राठोड यांच्या सुकन्या असलेल्या अनिता यांनी अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांची PSI पदावर झालेली निवड ही केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर समाजातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ग्रामीण आणि वंचित भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करू शकतात, हे अनिता राठोड यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशामुळे अनेक तरुणांना स्पर्धा परीक्षांची प्रेरणा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कु. अनिता राठोड यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत समाजसेवा करावी आणि भविष्यात आणखी उच्च पदांवर विराजमान व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link