एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न

बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न

जळगाव उपसंपादक | प्रणित काठोके

मुक्ताईनगर : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींविरुद्ध कारवाई करताना अपघात झालेली जप्त करण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी चोरीची असल्याचे मुक्ताईनगर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामुळे तपासाला नवे वळण मिळाले असून आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांचे आणखी धागेदोरे समोर येत आहेत.
मुक्ताईनगर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलाजवळ अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आलेल्या स्कॉर्पिओ वाहनाची सखोल तपासणी केली. वाहनावरील बनावट क्रमांक प्लेट आणि इतर संशयास्पद बाबी लक्षात घेऊन पोलिसांनी वाहनाच्या मूळ नोंदणीची पडताळणी सुरू केली.
तपासादरम्यान संबंधित स्कॉर्पिओ वाहन सुमारे दोन वर्षांपूर्वी एका सार्वजनिक सभेच्या ठिकाणाहून चोरीला गेल्याचे उघड झाले. याबाबत वाहन मालकाने धाराशिव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वाहनाचा शोध सुरू असतानाच ते मुक्ताईनगर पोलिसांच्या कारवाईत जप्त करण्यात आले.
वाहनाच्या इंजिन आणि चेसिस क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर जप्त करण्यात आलेली स्कॉर्पिओ ही धाराशिव येथे चोरीस गेलेली त्याच मालकाची असल्याचे निश्चित झाले. या निष्कर्षामुळे आरोपींचा संबंध वाहनचोरीच्या गुन्ह्यांशी देखील असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुक्ताईनगर पोलिसांनी याबाबत धाराशिव पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक माहितीची देवाणघेवाण सुरू केली असून वाहन चोरीच्या प्रकरणाचा तपासही पुढे नेण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या अटकेनंतर आणखी अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link