एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भुसावळात पहाटे पोलिसांची धडक मोहीम; सराईत गुन्हेगार, इराणी गँगच्या ठिकाणी छापे

भुसावळात पहाटे पोलिसांची धडक मोहीम; सराईत गुन्हेगार, इराणी गँगच्या ठिकाणी छापे

उपसंपादक | प्रणित काठोके

जळगाव जिल्हा पोलीस दलाने भुसावळ शहर व परिसरात आज पहाटे सुमारे ४ वाजेच्या सुमारास विशेष धडक कारवाई राबवून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली. या कारवाईत सराईत गुन्हेगार, इराणी गँग तसेच विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयित व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले.
सदर मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये RCP पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. गुन्हेगारांना बेसावध अवस्थेत पकडणे, त्यांच्यावर प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करणे आणि परिसरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालणे हा या कारवाईचा प्रमुख उद्देश होता.
कारवाईदरम्यान संशयित व सराईत गुन्हेगारांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली. तसेच विविध वाहनांची तपासणी करून संशयास्पद व मालकीबाबत खात्री नसलेली वाहने पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आली. अनेक व्यक्तींची पडताळणी करून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली असून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई अद्याप सुरू असून पुढील तपास आणि पडताळणीचे काम सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविणार असल्याचे सांगण्यात आले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link