एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुक्ताईनगरात वादळी पावसाचा तडाखा; वीजपुरवठा विस्कळीत, शासकीय गोडाऊनचे छत नुकसानग्रस्त

मुक्ताईनगरात वादळी पावसाचा तडाखा; वीजपुरवठा विस्कळीत, शासकीय गोडाऊनचे छत नुकसानग्रस्त

जळगाव उपसंपादक | प्रणित काठोके

मुक्ताईनगर शहरात हंगामातील पहिल्याच पावसाने जोरदार वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने विविध ठिकाणी नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यांवर पडल्याच्या घटना घडल्या.
वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. परिणामी अनेक परिसर अंधारात गेले. रस्त्यांवर पडलेल्या फांद्यांमुळे वाहतुकीलाही काही काळ अडथळा निर्माण झाला. प्राथमिक माहितीनुसार काही घरांसह इतर मालमत्तेचेही नुकसान झाले असून संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
बोदवड रोड परिसरातील नवीन मुक्ताई मंदिराच्या मागे उभारण्यात आलेल्या शासकीय गोडाऊनलाही वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. जोरदार वाऱ्यामुळे गोडाऊनच्या छतावरील काही पत्रे उखडून दूरवर फेकली गेली. त्यामुळे परिसरात काही काळ धोक्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. उडालेली पत्रे हटवून परिसर सुरक्षित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, हवामान विभागाने बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तुटलेल्या वीजवाहिन्यांपासून दूर राहावे, तसेच खराब हवामानात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पहिल्याच पावसात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे स्थानिक आपत्कालीन यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link