एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

यवत पोलिसांची गर्भलिंग निदान प्रकरणात मोठी कारवाई; चौघांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपीसह इतरांचा शोध सुरू

यवत पोलिसांची गर्भलिंग निदान प्रकरणात मोठी कारवाई; चौघांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपीसह इतरांचा शोध सुरू

यवत, ता. दौंड (प्रतिनिधी) : अशोक पाचुंदकर

गर्भलिंग निदान करून गर्भपातास प्रवृत्त केल्याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी महत्त्वपूर्ण प्रगती केली असून मुख्य आरोपीसह चौघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १४ मे २०२६ रोजी एका महिलीचे गर्भलिंग निदान करत असल्याचा व्हिडिओ प्राप्त झाला होता. त्यानंतर १७ मे २०२६ रोजी व्हिडिओची पडताळणी करण्यात आली असता आण्णासाहेब गिरी (रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे, मूळ रा. पारनेर, जि. अहमदनगर) हा महिलेचे गर्भलिंग निदान करत असल्याचे निष्पन्न झाले. यावरून यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक १४६/२०२६ अन्वये गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (PCPNDT) कायद्यांतर्गत कलम ६(ब), ६(क), १८, २३ व २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान २० मे २०२६ रोजी आण्णासाहेब गिरी यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास विविध टप्प्यांत पोलीस कोठडी मंजूर केली. चौकशीदरम्यान त्याने या गुन्ह्यात इतर आरोपींचाही सहभाग असल्याची माहिती दिली.
त्यानुसार,
अतुल अंकुश जाधव (रा. लोहगाव, पुणे) यास २४ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली.
मंदार सुरेश माळी (रा. किकवी, ता. भोर, जि. पुणे)
सुंदरम कदम (रा. उरुळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे)
यांचा देखील सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तसेच तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची वैद्यकीय तज्ज्ञ, पंच व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये आण्णासाहेब गिरी हा स्वतः गर्भलिंग निदान करत असल्याचे स्पष्ट झाले.
याच प्रकरणात आरोपींनी मुलगा जन्माला येण्यासाठी चुकीचे सल्ले व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचेही समोर आले असून भारतीय न्याय संहिता कलम ९१ चे अतिरिक्त कलम लावण्यात आले आहे.
तपासात आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यापैकी एका साक्षीदाराचा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १८३ अन्वये न्यायालयासमोर जबाब नोंदविण्यात आला आहे. आरोपींची बँक खात्यांची माहिती, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तसेच तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, हवेली पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अन्य गुन्ह्यात अटक असलेल्या नरेंद्र साहेबराव ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) याचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार व उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link