एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जळगाव पोलिसांची धडक विशेष मोहीम; दारूबंदी, जुगार व टवाळखोरांवर कारवाई

जळगाव पोलिसांची धडक विशेष मोहीम; दारूबंदी, जुगार व टवाळखोरांवर कारवाई

उप संपादक | प्रणित काठोके

जळगाव जिल्हा पोलिसांनी काल रात्री विशेष मोहीम राबवून विविध प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. या मोहिमेत दारूबंदी कायद्याचे उल्लंघन, जुगार, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे तसेच टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी मुंबई प्रोहिबिशन (दारूबंदी) कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल केले. या कारवाईत सुमारे ६ लाख ५२ हजार ८७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात १०५ दारूच्या बाटल्या, २८ विदेशी दारूच्या बाटल्या, १५ बीयर, ३१३ लिटर हातभट्टी दारू, ४५०० लिटर कच्चे रसायन तसेच १६०० लिटर केमिकल जप्त करण्यात आले.
याशिवाय जुगाराच्या २ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईत बी.पी. ॲक्ट कलम ११२/११७ अंतर्गत १९ टवाळखोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ७ जणांवरही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link