एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील तपासाला वेग; रोहित पवारांनी मांडले मुद्दे तपासात समाविष्ट

अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील तपासाला वेग; रोहित पवारांनी मांडले मुद्दे तपासात समाविष्ट

प्रतिनिधी अशोक पाचुंदकर

पुणे, दि. २९ मे २०२६: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेसंदर्भातील तपास योग्य दिशेने सुरू असून, आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेले मुद्दे तपासात समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दिली आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी २९ मे रोजी सीआयडी, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाला भेट देऊन विमान अपघातासंदर्भातील विविध मुद्दे अधिकाऱ्यांसमोर मांडले. त्यांनी मांडलेले मुद्दे सध्या सुरू असलेल्या तपासाचा भाग बनविण्यात येणार असल्याचे सीआयडीने स्पष्ट केले.
सीआयडीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रोहित पवार यांनी यापूर्वी वेळोवेळी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचाही तपासात समावेश करण्यात आला आहे. तपास योग्य दिशेने आणि योग्य गतीने सुरू असल्याचेही विभागाने नमूद केले आहे.
या प्रकरणातील तपासाचा मुख्य उद्देश फौजदारी कटकारस्थान, निष्काळजीपणाने केलेले वर्तन, बेकायदेशीर कृत्य अथवा संभाव्य घातपात यांसारख्या बाबी घडल्या आहेत का, याची सत्यता पडताळणे हा आहे.
तपासाच्या अनुषंगाने गुन्हे अन्वेषण विभाग विविध तज्ज्ञ संस्थांशी सातत्याने संपर्कात असून एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB), नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळा (FSL) यांच्या अहवालांचा अभ्यास केला जात आहे. संबंधित संस्थांकडून प्राप्त होणाऱ्या अहवालांच्या आधारे तपासाला पुढील दिशा दिली जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि सखोलपणे सुरू असून, सर्व बाबींची बारकाईने चौकशी केली जात असल्याचे सीआयडीकडून सांगण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link